Village Missionary Movement         கிராம மிஷனரி இயக்கம்

दैनिक भक्ती: (Marathi) 22.06.2025 (Kids Special)
Share:

By Village Missionary Movement

Sunday, 22-Jun-2025

दैनिक भक्ती: (Marathi) 22.06.2025 (Kids Special)

 

एक शहाणे मूल

 

"नीतिमानाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याच्याविषयी आनंद पावतो" - नीतिसूत्रे 23:24

 

नारियनपट्टी हे एक सुंदर, समृद्ध गाव आहे जिकडे पाहावे तिकडे हिरवेगार दिसते. त्या गावाच्या सीमेवर असलेल्या नदीच्या पात्रात नेहमीच पाणी वाहत असते. जेकब आणि जोन्स नावाचे दोन मित्र शाळेनंतर नेहमी नदीकाठी जातात. ते काही मित्रांसोबत त्या नदीच्या वाळूत खेळतात.

 

संध्याकाळी ६ वाजता, जोन्सची आई त्याच्यासाठी मोठ्याने हाक मारायची. तो प्रचंड वैतागून, रागाने घरी परतायचा. पण जेकब, त्याच्या आईला बोलवण्याआधीच, वेळेवर घरी परतायचा, त्याचा गृहपाठ पूर्ण करायचा आणि त्याच्या पालकांची आनंदाने आज्ञा पाळायचा. जोन्स घरी आल्यावरही, तो त्याचे गृहपाठ करत नाही किंवा त्याच्या आईची आज्ञा पाळत नाही. हे रोजचेच झाले. त्याची आई अनेकदा रडायची आणि त्याच्यासाठी प्रार्थना करायची. दुसऱ्या दिवशी ते त्याच मार्गाने नदीकाठी खेळायला गेले. 6 वाजता, जेकब घरी गेला आणि त्याने त्या दिवशी शाळेत शिकलेल्या धड्यांचा अभ्यास केला आणि शहाण्या मुलाप्रमाणे वागला. पण जोन्सच्या आईने त्याला कितीही हाक मारली तरी तो येणार नाही असे ओरडून सांगत होता. काही दिवसांपासून हे निरीक्षण करत असलेला पाळक जोन्सकडे आला, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि थोडा वेळ त्याच्याशी बोलू शकतो का असे विचारले आणि त्याला घेऊन गेले.

 

या नदीकाठी मी तुला रोज पाहतो. तू तुझ्या आईशी असं का वागतेस? त्याने विचारले. त्याने उत्तर दिले, "सर, माझ्या आईला माझ्यावर प्रेम नाही. तिला मी अजिबात आवडत नाही. ती नेहमी मला फक्त अभ्यास करायला सांगते. मी काही मागितले तर ती माझ्यासाठी देत नाही. पण जेकबच्या घरी ते त्याची काळजी घेतात आणि तो जे काही मागेल ते त्याला देतात. पाळकाने सल्ला दिला की जर तु जेकबप्रमाणे आज्ञा पाळलीत आणि येशूला प्रथम स्थान दिले आणि शहाण्या मुला प्रमाणे वागला तर सर्व तुला पसंद करतील. जोन्स विचार करत राहिला, पाळकाचे शब्द त्याच्या हृदयाशी बोलत होते, तो सकाळी उठताच त्याने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली.

 

प्रिय बंधू आणि भगिनींनो, या नवीन शैक्षणिक वर्षात, तुम्ही एक शहाणे मुलासारखे जगा, स्वतःला येशू ख्रिस्ताला समर्पित करा आणि प्रभु स्वतः तुम्हाला आशीर्वाद देवो.

- सौ. जीवा विजय

 

ही भक्ती मिळवण्यासाठी संपर्क करा वेबसाइट: www.vmm.org.in 

व्हॉट्स अॅप: +91 94440 11864 

ईमेल: info@vmm.org.in

Android अॅप: https://play.google.com/store/apps/details?id=com.infobells.vmmorgin

 

व्हिलेज मिशनरी मुव्हमेंट, 

विरुधुनगर, भारत -626001



hacklink satın al jojobet giriş jojobet casibom giriş bets10 extrabet royalbet süperbetin jojobet casibom holiganbet galabet matbet matbet giriş hilbet bahiscasino celtabet antikbet betoffice